प्राण्यांचा जीवनक्रम

प्रश्न १ .रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

१)फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानांवर  अंडी      घालते .

२)फुलपाखरांच्या          अळीला               सुरवंट म्हणतात .

प्रश्न २ .चूक की बरोबर ते सांगा .

१)शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते .
उत्तर - चूक

२)मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाही .
उत्तर - बरोबर

३)अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडताना तेव्हा त्यांना फारशी भूक नसते .
उत्तर - चूक


प्रश्न ३ .थोडक्यात उत्तरे लिहा

१)कोंबडीला अंडी का उबवावी लागतात ?
उत्तर - कोंबडीच्या पिल्लांच्या वाढीसाठी थोडी उब लागते ,म्हणून कोंबडी अंड्यावर बसून अंड्यांना उष्णता देते .म्हणून अंड्यातील पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडीला अंडी का उबवावी लागतात .

२) अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते ?
उत्तर -अंड्यांचे रक्षण आणि त्यांच्या काळजीपोटी कोंबडी आक्रमक होते .अंड्यांच्या जवळ कोणी जाऊ नये असे तिला वाटते .

३)फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या ?
उत्तर - अंडे ,अळी , कोश आणि प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत .

४)कोश या अवस्थेत बिबळ्या कळवा या फुलपाखरांच्या शरीरात कोणकोणते बदल होतात ?
उत्तर - बिबळ्या कडवा फुलपाखराची कोश अवस्था अकरा किंवा बारा दिवस असते .या अवस्थेत स्वतःभोवती आवरण निर्माण करून खाणे पूर्ण बंद होते .या कोशाच्या आत असलेल्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात त्यामध्ये पायांची लांबी वाढते आणि आकर्षक रंगाचे पंख तयार होतात .अशा प्रकारचे बदल दिसून येतात

Post a Comment

Previous Post Next Post