मी बिबट्या बोलतोय !


मला पाहून ,माझा आवाज एकूण  घाबरले नाहीत ना ?  होय मी बिबट्या आहे, नेहमी प्रमाणे आपले जंगलात राहणारा, गुपचूप शिकार करून आपले पोट भरणारा , अंगावर सोनेरी फुलांच्या पाकळ्यांचा सारखे काळे ठिपके असणारा बिबट्या.  होय मी तोच आहे आज मी तुम्हाला माझ्या मनातली व्यथा सांगणार  आहे. 

तुम्हाला वाटले असेल बिबट्याला काय गरज पडली माणसाशी  बोलायला पण वेळेच तशी आहे . जेव्हा एखाद्याच्या घरावर हल्ला होतो त्यावेळेस त्याला कुठेतरी आपण आपलं मन मोकळं करावं लागतं. तुम्हीच पाहता  बिबट्या इतर वन्य प्राणी जंगल सोडून शहराकडे गावाकडे आले आहेत. रोज कुठे ना कुठे तरी बिबट्या दिसला त्याचा व्हिडिओ मोबाईलवर तुम्ही पाहता, कुठे छतावर उड्या मारताना ,कुठे विहिरीत पडलेला आणि वनरक्षकांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या ,पण हे का घडायला लागलं याचे मूळ कारण काय आहे याचा शोध तुम्ही घेतला का ?

माणूस आपल्या प्रगतीच्या नावाखाली खूपशी जंगली तोडतोय आणि जंगली आमचे घर आहे. त्यातच आमच्यासोबत इतर  प्राण्यांची शिकारही करतोय, आता जर  हे प्राणीच नाही राहिले तर मी खाणार काय?गवत ! आम्ही मांसाहारी,  आता तुम्ही विचार करा  जंगलात प्राणीच नाही राहिले तर आम्हाला खाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील म्हणून आज मला जंगल सोडून उसाची शेती, मोठमोठाले ओढे  या ठिकाणी अन्नाच्या शोधात यावे लागते.

तुम्ही म्हणाल वनरक्षकांना बोलवा  बंदूक घेऊन आणि ठार करा आम्हाला , पण मित्रांनो हे असं नाही आम्ही सुद्धा अन्नसाखळीचा एक मोठा भाग आहोत जर अन्नसाखळीतली एक जरी कडी  तुटली  तर पूर्ण निसर्गाचा समतोल बिघडू शकतो त्यामुळे आम्हीही खूप महत्त्वाचे  आहोत . 

इकडे तिकडे कुठे बिबट्या दिसला की त्याला सापळा लावून आम्हाला पकडलं जाते . आता तुम्हीच पहा ना तुम्ही जर एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेल्यावर कसं वागतात काय कोठे  काय आहे?  हे काय आहे?  कसे आहे समजत नाही?  आमचे तसंच आहे आमचा नेहमीचा निवारा सोडून जर तुम्ही आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सोडलं तर आम्हाला समजत नाही कुठे जावे ?  शेवटी आम्हीही  घाबरतो ना!  म्हणून मित्रांनो कृपया करून आम्हालाही  जगायचं आहे. आमचे घर नष्ट करू नका ,जगा आणि जागुद्या …




Post a Comment

Previous Post Next Post