साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
हवा
प्रश्न१.दिलेल्या कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा
(अधिक, ५०, एक, विरळ, हवा)
१) रिकाम्या भांड्यात हवा असते.
२) पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वी लगतच्या हवेपेक्षा विरळ असते.
३) हवेचे पाच भाग केल्यास त्यातील एक भाग ऑक्सिजन असतो.
४) पृथ्वीपासून जवळ जवळ ५० किमी अंतरावर हवा पसरली आहे.
५) हवेचे पृथ्वी जवळचे तर वरच्या थरात पेक्षा अधिक भार पेलतात.

प्रश्न 2 जरा डोके चालवा.

 १) रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तू मध्ये हवा दाबून भरलेली असते ?
उत्तर- फुगा ,फुटबॉल, मोटर सायकलची ट्यूब 

२) लाकूड किंवा कोळसा जाळताना हवेत काय मिसळताना दिसते?
 उत्तर- लाकूड किंवा कोळसा जळाल्यामुळे हवेत धूर मिसळतो, त्यासोबत काही विषारी वायू आणि कण असतात ते ही हवेत मिसळतात.

३)पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते.
 उत्तर- पाणी उकळत असताना हवेमध्ये पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प मिसळत असते.

४) ज्वलनासाठी हवेतील कोणता वायू मदत करतो.
 उत्तर -  ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू मदत करतो.

प्रश्न३. थोडक्यात उत्तरे लिहा.
१) इंजेक्शनच्या सीरिजमध्ये औषध घेण्यापूर्वी त्यांची दांडी आधी दाबतात कशासाठी?
 उत्तर- सीरिजमध्ये औषध भरण्यासाठी सिरींजची दांडी दाबली जाते.
जेव्हा ती दाबली जाते तेव्हा त्यातील हवा निघून जाते. त्यानंतर जेव्हा दांडी वर ओढली जाते तेव्हा रिकाम्या झालेल्या सीरिजमध्ये औषध वर चढू लागते , जर सीरिजमध्ये हवा राहिली तर सीरिजमध्ये औषध येणार नाही.

२) हवेमध्ये कोणते वायू असतात? 
उत्तर- हवेमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, बाष्प आणि इतर वायू असतात.  हवेमध्ये सर्वात जास्त भाग हा नायट्रोजन असतो त्यानंतर ऑक्सिजनचा असतो.

३)मेणबत्तीच्या प्रयोगावरून आपणाला काय लक्षात येते.
उत्तर-  मेणबत्तीच्या प्रयोगावरून असे लक्षात येते की जेव्हा मेणबत्ती उघडी होती तेव्हा ऑक्सिजन मेणबत्ती ला जळण्यासाठी मदत करत होता. परंतु जेव्हा मेणबत्तीवर उलटा ग्लास ठेवला व मेणबत्ती ला हवा जाण्याचे मार्ग बंद झाले त्या कारणाने मेणबत्तीला ऑक्सीजन मिळाला नाही व त्यामुळे मेणबत्ती विजली यावरून असे लक्षात येते की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते.
 

Post a Comment

Previous Post Next Post