साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
आपल्या अवतीभवती


 प्रश्न १ .गाळलेले शब्द भरा .
१)कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा             
    बदलेल .

२)कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण       
           कापड          विणतो .

३)झाडांची पाने          गळतात            तीही पडून कुजतात .

प्रश्न २ .चुक की बरोबर ते सांगा .

१)काही वनस्पतींच्या बिया वार्‍यामुळे विखुरल्या जातात .
उत्तर -बरोबर

२)वनस्पती निर्जीव आहेत .
उत्तर - चूक

३)किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते .
उत्तर - बरोबर

प्रश्न ३ .खालील प्रश्नांची उत्तरे द्या .
१)माणसाला परिसरातून कोण कोणत्या वस्तमिळतात ?
उत्तर - माणसाला परिसरातून सगळ्या गरजा पूर्ण होतात .लाकूड माती दगड यांपासून माणूस घर बनवतो कापसापासून कापड मिळते .वह्यांचे कागद पेपर चे कागद टोपल्या या साठी लागणारे साहित्य  परिसरातून मिळते .

२)वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते ?
उत्तर - वनस्पतिंना जगण्यासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश ,हवा , पाणी परिसरातून मिळते .कुजलेले प्राणी कुजलेल्या वनस्पती यांपासून माती कसदार होते .वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे किंवा प्राण्यांमुळेविखुरल्या जातात त्यामुळे तर रोपे तयार होतात .

३)जंगलातील माती कशामुळे कसदार होते ?
उत्तर - वनस्पतींची पाने , मेलेल्या प्राण्यांचे कुजलेले भाग मातीत पसरतात अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात त्यामुळे जंगलातील माती कसदार होते .प्रश्न ४)जरा डोके चालवा .

१)कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत ?
उत्तर - कापसापासून धागा बनवणे कापड बनवतात तसेच गादी - उशी बनवता .जखमांवर वापरण्यासाठी कापूस बनवतात .अशा विविध कामांसाठी कापसाचा उपयोग होतो .

२)चपला कशापासून बनवतात ?
उत्तर -चपला रबर आणि चामडे यांपासून बनवतात .

३)चिमणी व दगडांच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल ? दगड काय
 करेल ?
उत्तर -चिमणीच्या जवळ आवाज झाला चिमणी उडून जाईल .दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला आणि दगडावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही .

४) पाल काय खाते ?
उत्तर -पाय छोटे छोटे किडे खाते .

५)तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा .
उत्तर - घरात खुर्ची , टेबल , खिडकी , दरवाजा बसण्यासाठी असलेला पाट  यांसारख्या वस्तू आहेत .

६)कोण कोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात ?
उत्तर -मांजर आणि साप हे प्राणी उंदीर खाऊन पोट भरतात .प्रश्न ५ .कोळीजाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा . कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा .
उत्तर - कोळ्याच्या जाळ्यात त्याचे भक्ष्य अडकते .जाळ्यात काही चिकट पदार्थ असल्यामुळे निसटू शकत नाही अशाप्रकारे आपले भक्ष्य पकडण्यासाठी कोळी जाळे विणतो .


वेब सोर्स - ई बालभारती

Post a Comment

Previous Post Next Post