४.पाणी किती खोल?
स्वाध्याय


प्रश्न १ . एका वाक्यात उत्तरे लिहा .

           १) म्हशीला काय चावता येत नव्हते ?
      उत्तर - म्हशीला कडबा चावता येत नव्हता .

           २) पाणी कमी आहे , असे कोणाचे म्हणणे होते ?
      उत्तर - पाणी कमी आहे , असे बैलकाकांचे म्हणणे होते .

           ३) झाडावरून कोण हाक मारत होते ?
       उत्तर - झाडावरून खारुताई हाक मारत होती .          ४) खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली ?
      उत्तर - खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली ; कारण नदीला खूप पाणी होते .

         ५) नदी पार केल्यावर रेडकाने काय केले ?
     उत्तर - नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले .

     प्रश्न २ . कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा .

     १) " आता मी खरंच म्हातारी झालीय . "
    उत्तर - असे म्हैस रेडकाला म्हणाली ; कारण तिला कडबा चावता येत नव्हता .

    २) "गुडघ्याइतकंच तर पाणी आहे . आरामात जाशील . "
   उत्तर - असे बैल रेडकाला म्हणाला ; कारण बैलाच्या मते नदीत कमी पाणी होते .


   ३) " वाहून जाशील . मागं फिर . "
  उत्तर - असे खारुताई रेडकाला म्हणाली ; कारण                      खारुताईच्या मते नदीत खूप पाणी होते .

   ४) " मग तुला घाबरायचं काय कारण ? "
 उत्तर - असे म्हैस रेडकाला म्हणाली ; कारण रेडकू                      खारुताईपेक्षा मोठा व उंच होता .

   ५) " मला सहज जाता येईल . "
  उत्तर - असे रेडकू स्वतःशीच म्हणाले ; कारण म्हशीच्या              बोलण्याने त्याला    आत्मविश्वास आला होता.

   प्रश्न ३ . जोड्या जुळवा     उदा . कडबा - पेंढी

       अ ' गट                      ' ब ' गट
    अ) लाकडाची                 १) मोळी
    आ) मेथीची                     २) जुडी
    इ) पुस्तकांचा                    ३) गठ्ठा

  प्रश्न ४) रेडकूची गोष्ट तुमच्या शब्दांत सांगा .
उत्तर -
     म्हैस म्हातारी झाल्यामुळे तिला कडबा चावता येत नव्हता म्हणून तिने आपल्या नातवाला नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवरून रेडकूला कडबा कापून आणायला सांगितला . नदीच्या पाण्याचा मोठा आवाज ऐकून रेडकू घाबरले . बैलकाका नदीजवळ चरत होते . बैलकाका रेडकूला म्हणाले , नदीला पाणी माझ्या गुडघ्याइतकंच आहे घाबरू नको आरामात जाशील . पण खारूताई रेडकाला म्हणाली , कालच माझी मैत्रीण वाहून गेली . पाणी जास्त आहे .मागे फिर .
      रेडकू गोंधळूण गेले . ते माघारी आले . तेव्हा त्याला म्हातारी म्हैस म्हणाली - सकाळीच गाढवदादा नदी पार करून आला बैलकाका उंच आहे नि खारुताई बुटकी आहे . तू खारूताईपेक्षा मोठा व उंच आहेस . तू घाबरू नकोस .
म्हशीने नातवाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला . रेडकूने आनंदाने नदी पार केली आणि गाणे म्हणत ते कडबाकुट्टीच्या दिशेने गेले .


22 Comments

 1. छान माहिती दिलीत...! Nice...!

  ReplyDelete
 2. खूप छान प्रश्न उत्तर आहेत मुलानं त्याचा खूप फायदा आहे

  ReplyDelete
 3. खुप छान आहे

  ReplyDelete
 4. अभ्यासात​ फार मदत होते

  ReplyDelete
 5. Khemanand English school, jamkhed

  ReplyDelete

Post a comment

Previous Post Next Post