५) एकदा गंमत झाली

प्रश्न१. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता?
उत्तर:- आम्हाला आनंद झाला की आम्ही टाळ्या वाजवतो.

आ) नदीचे पाणी आणखी किंवा वाढते?
उत्तर:- डोंगरावरून येणारे ओहोळ , ओढे , छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात, तेव्हा नदीचे आणखी पाणी वाढते.

इ) बाईंनी कशाचे चित्र काढून आणायला सांगितले ?
उत्तर - बाईंनी नदीचे चित्र काढून आणायला सांगितले .

ई) बाईंनी कोणती कविता वर्गात शिकवली ?
उत्तर - बाईंनी नदीची कविता वर्गात शिकवली .

उ) मनुलीने कसली पाने पुस्तकात ठेवली ?
उत्तर - मनुलीने पिंपळाची दोन पाने पुस्तकात ठेवली .

प्रश्न २ . रिकाम्या  योग्य शब्द लिहा .

अ) झाडं मात्र ...... . . . . . . . .  पानांनी टाळ्या वाजवू लागतात .
उत्तर - झाडं असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात .

आ) एखाद्या डोंगरात नदीचा .. . . . . . . . . . होतो .
उत्तर एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो .

प्रश्न ३ . कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा .
( पुढं पुढं , छोटे छोटे , तरंगत तरंगत , गारगार , उंच उंच )

अ) ....... वाऱ्याच्या झुळकेनं मनुली सुखावली .
उत्तर गार गार वार्‍या च्या झुळकेन मनुली सुखावली

आ) पिंपळाची दोन पानं ......... खिडकीतून आत आली .
उत्तर - पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली .
इ) ........ झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं .
उत्तर - उंच उंच झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं .
ई) नदी .. . .. . . . . जाऊ लागते .
उत्तर - नदी पुढं पुढं जाऊ लागते .
 उ) बाजूच्या शिरा म्हणजे ........... ओहोळ .
उत्तर - बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ .

प्रश्न ४ . एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत . उदा . उंच उंच असे आणखी शब्द सांगा 
उत्तर १) लहान लहान,
२ ) वाहत वाहत,
३ ) गप्प गप्प .

प्रश्न ५ ) विरुद्धार्थी शब्द लिहा .

अ) सरळ x वाकडे
आ) लांब x जवळ
इ ) पुढे x मागे 
ई) लहान x मोठा
उ) शांत X अशांत
ऊ) हसली x रडली


प्रश्न ६) पाठामध्ये ' टोकदार ' शब्द आलेला आहे , त्यासारखे शब्द बनवा .               .  जसे - टोक - टोकदार

उत्तर अ) रुबाब - रुबाबदार           आ) समजूत - समजूतदार
         इ) धार - धारदार।                 ई) पाणी - पाणीदार
         उ) तजेल - तजेलदार।          ऊ)चमक - चमकदार

प्रश्न ७ . शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा .

अ)अलगद उचलणे - सावकाश उचलणे .
आ) एकटक पाहणे - एकाच जागी नजर लावून पाहणे .
इ ) मोरपीस फिरवल्यासारखे - सुखद स्पर्श व्हावा तसे .
ई)सुखावणे - संतोष होणे , आनंद होणे .
उ)दंग असणे - गुंग असणे .

प्रश्न ८ . मनुली पानांकडे एकटक पाहू लागली , तसे तुम्हांला कोणकोणत्या गोष्टींकडे एकटक पाहावेसे वाटते ? 
उत्तर . पाणी, नदी , विमान व फुलपाखरू इत्यादी वस्तूंकडे एकटक पाहावेसे वाटते .

प्रश्न ९ . पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली . तशी तुम्हांला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते , ते सांगा .
उत्तर - झाडाचे खोड व फांद्या .ज्याप्रमाणे झाडाच्या खोडाला मोठाल्या फांद्या येऊन मिळतात, त्या मोठाल्या फांद्यांना लहान फांद्या मिळतात अगदी नदीला छोटी-छोटी मिळाल्या सारखे वाटतात.

8 Comments

Unknown said…
Manvi Santosh Shinde
Unknown said…
अथर्व सुरेश मोहिते
Unknown said…
Deven
Avinash
Kadam
Unknown said…
Atharv deepak jangam,
Unknown said…
Its nice study program
Unknown said…
सुंदर आहे आभ्यासिका
Unknown said…
तनु महेश नाईक
Unknown said…
Very nice 👍
Previous Post Next Post