साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
शर्थीने खिंड लढवली 

प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१.सिद्दी जौहरने              पन्हाळगडाला           गडाला चौफेर वेढा घातला .

२.बाजीप्रभूची        स्वामिभक्ती       बघून शिवराय गहिवरले .

3.घोडखिंड '            पावनखिंड       ' या नावानेच इतिहासात अमर झाली .

४.तोफांचे आवाज ऐकताच,स्वामिभक्त        बाजीप्रभूने    प्राण सोडला.

५.बाजीप्रभू देशपांडे            स्वराज्यासाठी        धारातीर्थी पडले .

प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा .

१.शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढयातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप पाठवला ?
उत्तर - शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढयातून सुटका करूनघेण्यासाठी ' लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो,'असा निरोप सिद्दीला पाठवला .

२.विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले ?
उत्तर -विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले की , " आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या . "

३.सिद्दी जौहर का चवताळला ?
उत्तर - शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढयातून निसटल्याचे लक्षात येताच,सिद्दी जौहर चवताळला .

४.विशाळगडावर जाताना शिवरायांच्या सोबत कोण कोण होते ?
उत्तर -विशाळाडावर जाताना शिवरायांच्या सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल - देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते .

५ .सिद्दी जौहर वेढा केव्हा उठवील,असे शिवरायांना वाटत होते ?
उत्तर -पावसाळा सुरू झाला की सिद्दी जौहर वेढा उठवील , असे शिवरायांना वाटत होते .

प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत कारणे लिहा.
१.आदिलशाहा भयंकर चिडला .
उत्तर - विजापूर दरबारातील बलाढय सरदार अफजलखान याचा शिवरायांनी वध केला होता . त्यामागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशाहा भयंकर चिडला .

२.शिवरायांच्या सेवेमधील शिवाजी अमर झाला .
उत्तर - शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी शिवरायांची आहे,असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती सिद्दी जौहरच्या छावणीत नेली . तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले . इकडे थोडया वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्दीने त्याला ठार मारले . अशा रितीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला .

३.पावनखिंड इतिहासात अमर झाली .
उत्तर -स्वामिभक्त बाजीप्रभूने घोडखिंड अखेरपर्यंतलढवली . शिवराय गडावर पोहोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरचबाजीप्रभूंनी प्राण सोडला . अशा प्रकारे स्वामिभक्ताच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली;त्यामुळे  'पावनखिंड ' या नावाने ती इतिहासात अमर झाली .

प्रश्न ४.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .

१.पन्हाळगडाच्या वेढयातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली ?
उत्तर - पन्हाळगडाच्या वेढयातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून दोन पालख्या सज्ज केल्या.एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार . ही पालखी   शत्रुला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार . त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढयातून निसटून जाणार .

२.बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली ?
उत्तर - बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्यातुकडया पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या.खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभीकरून , बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला.शत्रू खिंडीत आला की , वरुन जमा केलेल्य दगड - गोट्यांचा वर्षाव करायचा , अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूने योजना आखली .

2 Comments

Unknown said…
Yogesh Madakwar
Unknown said…
Yogesh Madakwar
Previous Post Next Post