उन्हाळी अभ्यास

उन्हाळी अभ्यास उपलब्ध आहे
गड आला पण सिंह गेला  

प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

१ ) कोंढाणा सर करण्याची कामगिरी देताना , शिवरायांच्या डोळ्यांसमोर       तानाजी     याचेच नाव आले .

२) कोंढाणा सर करण्याची घटना        १६७०      साली घडली.

३) तानाजीच्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे        सिंहगड         हे नाव सार्थ झाले .

 प्रश्न २.एका शब्दात उत्तर लिहा .

१ ) तानाजी हा कोकणातील कोणत्या गावात राहत होते ?
उत्तर - उमरठे

२ ) जयसिंगाने नेमलेला उदेभान कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता ?
उत्तर - कोंढाणा

३ ) तानाजीच्या भावाचे नाव कोणते होते ?
उत्तर - सूर्याजी

प्रश्न ३.एका वाक्यात उत्तरे लिहा .

१ ) कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?
उत्तर - कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता .

२ ) कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या ?
उत्तर - " कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही ,तो परत घे . " असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या .

३ ) ' आधी लग्न कोंढाण्याचे , मग रायबाचे ' असे कोण म्हणाले ?
उत्तर - ' आधी लग्न कोंढाण्याचे , मग रायबाचे ' असे तानाजी शिवरायांना म्हणाला .

४ ) मावळ्यांचा धीर का खचला ?
उत्तर - तानाजी धारातीर्थी पडल्याने मावळ्यांचा धीर खचला .

५ ) तानाजी कोणत्या कामासाठी शिवरायांकडे आला होता ?
उत्तर - शिवराय आणि जिजामाता यांना आपल्या मुलाच्या - रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी शिवरायांकडे आला होता .

प्रश्न ४.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .

१ ) शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले ;त्या वेळी शिवराय काय म्हणाले ?
उत्तर - शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले; त्या वेळी त्यांना शिवराय म्हणाले , " तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही; कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत .

२ ) सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ?
उत्तर - तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला , " अरे , तुमचा बाप इथे मरून पडला आहे . तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता ? मागे फिरा. मी कडयावरचा दोर कापून टाकला आहे .
 कडयावरुन उड्या टाकून मरा ; नाहीतर शत्रूवर तुटून पडा . "

Post a Comment

Previous Post Next Post