साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त 

प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
१.भोरप्या डोंगरावर शिवरायांनी       प्रतापगड       हा किल्ला बांधला .

२.खंडोजी आणि बाजी घोरपडे यांनी            कोंढाणा         भागात धुमाकूळ माजवला .

३.मोरे हे        जावळीचे          जहागीरदार होते .

४.जावळीच्या विजयाने        रायरीचा       प्रचंड किल्ला स्वराज्यात आला .

५.शिवराय              कर्तव्यापुढे                नातेगोते मानत नसत.


प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा.
१.जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने कोणता किताब दिला होता ?
उत्तर - जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने 'चंद्रराव ' हा किताब दिला होता .

२.जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता ?
उत्तर - जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता; कारण या विजयामुळे  शिवरायांचे स्वराज्य पुर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला .

३.शिवरायांच्या स्वराज्याला कोणते सरदार विरोध करीत होते ?
उत्तर - शिवरायांच्या स्वराज्याला निंबाळकर घोरपडे , मोरे इत्यादी सरदार विरोध करीत होते .

४.आदिलशाहाने आपल्या चाकरीतील कोणत्या सरदारांना शिवरायांविरुद्ध चिथावले ?
उत्तर - आदिलशाहाने आपल्या चाकरीतील खंडोजी आणि बाजी घोरपडे या सरदारांना शिवरायाविरूद्ध चिथावले.

५.मोऱ्यांची जहागीर कोठून कोठपर्यत होती ?
उत्तर - मोऱ्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती .

प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
१.जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे ?
उत्तर - जावळीचे जंगल इतके दाट होते , की भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता . या जंगलात वाघ , लांडगे , अस्वले इत्यादी श्वापदे संचार करीत.मोऱ्यांची जावळी जणू वाघाची जाळीच होती;त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे .

२ .शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले ?
उत्तर - स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या करणाऱ्या यशवंतराव मोरे याला शिवरायांनी पत्र धाडले की ," तुम्ही राजे म्हणाविता,राजे आम्ही . आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधल आहे , तर तुम्ही राजे न म्हणावे . " 

३.यशवंतराव मोरे याने शिवरायांना कोणत्या गोष्टी देण्याचे कबूल केले ?
उत्तर - जावळीच्या गादीवर बसवण्यात शिवरायांनी केलेल्या मदतीच्या बदल्यात यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले.तसेच शिवरायांच्या कार्यात मदत करण्याचेही
 कबूल केले .

Post a Comment

Previous Post Next Post