साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
प्रतापगडावरील पराक्रम 


प्रश्न १ . रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

१.शिवराय व अफजलखान यांची      प्रतापगडाखालच्या          माचीवर             भेटण्याची जागा निश्चित झाली .

२.अफजलखान बारा वर्षे             वाईचा           सुभेदार होता .

३.विजापूर दरबारी                अफजलखान               हा तुफान ताकदीचा सरदार होता .

४.अफजलखान मारला गेला , ही बातमी         फाजलखानामुळे         विजापूर दरबारी पोहोचली .

प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा.
१.अफजलखानाने कोणता विडा उचलला ?
उत्तर - अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडूनकिंवा ठार मारून आणण्याचा विडा उचलला .

२.प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?
उत्तर - प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना निरोप पाठवला , '' तुम्ही माझ्या मुलासारखे,मला भेटायला या . आमचे किल्ले परत दया,तुम्हांला मी आदिलशाहाकडून सरदारकी देववितो . "

३.आदिलशाही दरबारापुढे कोणता महत्त्वाचा प्रश्न होता ?
उत्तर - शिवाजीचा बीमोड कसा करायचा,हा आदिलशाही दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता .

४.बडा सय्यद कशात पटाईत होता ?
उत्तर - बडा सय्यद पट्टा चालवण्यात पटाईत होता .

५.शिवरायांच्या अंगरक्षकांत कोणाकोणाचा समावेश होता ?
उत्तर - शिवरायांच्या अंगरक्षकांत जिवाजी महाला,संभाजी कावजी , येसाजी कंक , सिद्द इब्राहिम यांचा समावेश होता .

प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत कारणे लिहा .
१.शिवराय प्रतापगडावर गेले , ही बातमी खानाला कळताच तो चिडला .
उत्तर -प्रतापगड हा किल्ला डोंगरावर होता . त्याच्या भोवताली घनदाट जंगल आणि वाटेत उंचच उंच डोंगर होते . फौजेला जायला चांगली वाट नव्हती;तसेच तोफा चढवायला मार्ग नव्हता . जंगलीजनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता.अशा या किल्ल्यावर जाणे सोपे नाही, हे अफजलखानाला माहीत होते . त्यामुळे शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी समजताच अफजलखान चिडला .

२.विजापुरात हाहाकार उडाला .
उत्तर - शिवरायांनी विजापूरचा बलाढय सरदार अफजलखानास ठार मारले . त्याच्या फौजेची दाणादाण उडवली.अफजलखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा निसटला
 व विजापूरला पोहोचला . त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला .प्रश्न ४.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
१.शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच  सामना देण्याचे का ठरवले ?

उत्तर - अफजलखान चालून येत आहे , हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे , हे शिवरायांनी ओळखले.खान कपटी आणि त्याची फौज मोठी तर आपले राज्य लहान व सैन्यही छोटे .उघडया मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे ठरवले .   

२.अफजलखानाच्या भेटीला  शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?
शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले , " गडयांनो ,आपापली कामे नीट करा .भवानीआई यश देणार आहे.पण समजा, आमचे काही बरेवाईट झाले,
 तर तुम्ही धीर सोडू नका . संभाजीराजांना गादीवर बसवा . मासाहेबांच्या आज्ञेत वागा .
स्वराज्य वाढवा .रयत सुखी करा . "

 

Post a Comment

Previous Post Next Post