साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
आहाराची पौष्टिकता 

प्रश्न १ .रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१)फळांमध्ये   साखर  असल्याने फळे गोड लागतात .

२)तांदूळ ,गहू ,ज्वारी , बाजरी हे आपले     प्रमुख       अन्नपदार्थ आहे .

३)जिभेवर च्या छोट्या छोट्या उंचवट्यांना   रुचिकलिका      म्हणतात .

४ )पीठ चाळून    कोंडा    काढून टाकू नये .



प्रश्न २ .जोड्या लावा .
' अ ' गट                 ' ब ' गट
१)दूध -                   लोणी
२) तीळ -                 तेल
३) ज्वारी -              पीठ
४)चिकू -                साखर

प्रश्न ३ .कारणे सांगा .
१)अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी .
उत्तर - अन्नपदार्थ शिजवताना त्यातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात त्यामुळे जास्त वेळ शिजवल्याने अन्न गुण कमी होतात .म्हणून असे होऊ नये म्हणून अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यावी .

२)शरीर धडधाकट हवे .
उत्तर - आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायची असतील तर आपले शरीर धडधाकट असले पाहिजे तसे नसल्यास आपण सारखे आजारी पडून व काम करण्याची ताकत राहत नाही .

३)आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत .
उत्तर -शरीराच्या विविध गरजा भागवण्यासाठी निरनिराळे अन्नपदार्थ आवश्यक असतात तेच ते पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या सर्व अन्नविषयक गरजा पूर्ण होणार नाहीत .

प्रश्न ४ .थोडक्यात उत्तरे लिहा .
१)मोनिकाताईने जीभेची कोणती गंमत सांगितली ?
उत्तर -एकाच जिभेने वेगवेगळ्या चवी समजतात ही जिभेची  गंमत मोनिका ताईंनी सांगितले .

२)फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का ?
उत्तर - फळात साखरेबरोबरच निरनिराळे अन्नघटक देखील असतात .

३)आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते ?
उत्तर - लिंबू ,चिंच , टोमॅटो अशा अन्नपदार्थात आंबट घटक असतात .

प्रश्न ५ .जरा डोके चालवा .
१)नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते ?
उत्तर - य भाजणीच्या पिठात काही धान्य व डाळी यांचे खरपूस भाजून मिश्रण केलेले असते .ज्वारी-बाजरीच्या पिठापेक्षा डाळींचे पिठ अन्न गुणांनी भरपूर व पौष्टिक असते .

२)भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातलेले पदार्थाचा पौष्टीकपणा वाढतो की कमी होतो ?
उत्तर -दाण्याच्या कुटात आणि खोबऱ्याच्या किसात पोषकद्रव्य असतात त्यामुळे ते भाजीत मिसळल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो .

३)वरण-भातावर लिंबू कशासाठी पिळतात ?
उत्तर -लिंबू जेवणाला रुची आणते तसेच लिंबू रसात जीवनसत्व ' क ' हे पौष्टीक द्रव्य असते म्हणून वरण-भातावर लिंबू  पिळतात .

४)शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकास साखर जास्त प्रमाणात असते ?
उत्तर - उसाच्या पिकास साखर जास्त प्रमाणात असते .

Post a Comment

Previous Post Next Post