साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

छत्रपती शिवाजीराजे

मराठी छोटी छोटी भाषणे


नमस्कार मित्रांनो !

 आज शिवजयंती आपल्या शंभूराजांची जयंती या निमित्त तुम्हाला मी दोन-चार शब्दात जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती .

शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला .मी आज तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या जीवनातील खूप महत्त्वाचा प्रसंग सांगणार आहे तो प्रसंग आहे राज्याभिषेकाचा . तीस वर्ष अथक परिश्रमाचे चीज राज्याभिषेकातून झालं होतं . राज्याभिषेक पूर्णत्वाला आला " क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती " यांचा विजय असो असा सर्वांनी जयजकार केला. प्रत्येक गडगडावर तोफा झाल्या . सर्व महाराष्ट्रात शिवरायांचा जयजयकार झाला . राज्याभिषेक सन १६७४ मध्ये झाला . त्या सालापासून ' राज्याभिषेक ' हा शक सुरू करण्यात आला . याचा अर्थ शिवाजी राजे शककर्ते राजे झाले होते . त्यांनी आपल्या राज्यासाठी स्वतंत्र नाणी पाडली . विशेष म्हणजे या समारंभासाठी शिवरायांना शुभेच्छा देण्यासाठी इंग्रजांनी ऑक्झिडेन नावाचा एक अधिकारी नजराणा घेऊन पाठवला होता . म्हणजेच राज्याभिषेकाचा बातमी इंग्रजांपर्यंत सुद्धा पोहोचली होती आणि त्यांनीही आपल्या राजांना शुभेच्छा  पाठवल्या . त्यावेळी मासाहेबांच्या डोळ्यातून आनंद सुरू झाले  कारण त्या माऊलीने जे स्वप्न पाहिले  होतं ते आज पूर्ण झालं होतं .

आपल्या राजाला मानाचा मुजरा करतो आणि मी माझे भाषण संपवतो .

 जय जिजाऊ जय शिवराय .


अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन आणी मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत हा प्रसंग महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण आहे .  महाराष्ट्रात महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि होणारा रयतेचा छळ थांबवला . रयतेच्या उत्कर्षासाठी त्यांनी मुगलांविरुद्ध , आदिलशाही विरुद्ध युद्ध पुकारले आणि विजयी झाले . स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटी आली परंतु त्यांच्या सोबत आईसाहेब होत्या . राजे प्रत्येक संकटाच्या वेळी आईसाहेबांशी  सल्ला मसलत  करायचे . महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्याचे ध्येय अंतिम ठरवून महाराजांसोबत अनेक शूर मावळेही या महान कार्यात सामील झाले . तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण दिले . 

शेवटी या महान राजाला कोटी कोटी वंदन करतो आणि थांबतो

जय जिजाऊ जय शिवराय ॥॥आदरणीय मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला महाराजांच्या जयंतीनिमित्त जे काही  दोन-चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे एकूण घ्यावे ही विनंती.

इतिहासाच्या पानावर ,रयतेच्या मनावर , मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती . महाराष्ट्राच्या मातीचा मान , मराठी  माणसांची शान आपले शंभुराजे यांना मी प्रथम वंदन करून मी भाषण सुरू करतो . महाराष्ट्रात सुवर्ण दिवस उजाडला फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेच्या पोटी जन्म झाला . आई जिजाबाईंनी बाल शिवबाच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली  नाही.  जिजाबाईंनी महाराष्ट्रात होत असलेला अन्याय पहिला होता या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्यायाविरुद्ध स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्या बाल शिवबाला घडवत होत्या .आणि या शिक्षणाचे फलित म्हणजे शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा. 

शिवरायांनी आयुष्यभर न थांबता रयतेसाठी कार्य केले . हा काळ  30 ते 35 वर्षाचा होता . दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी सर्वांना दु :खासागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला . या महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम 

जय जिजाऊ जय  शिवराय ll  


Post a Comment

Previous Post Next Post