साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
अन्नातील विविधता 


प्रश्न १ .रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१)जमिनीचा      वाफसा    झाला की पेरणी करतात .

२) कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला        मळणी     म्हणतात .

३)वाऱ्याने हलकी     टरफले       उडून दूर जातात .

४)काही लोक बोरे ,करवंदे अशी      फळे जंगलातून गोळा करून विकतात .

५)अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात ती चालवण्यासाठी       इंधनावर             खर्च होतो .

प्रश्न २ .योग्य जोड्या जुळवा .
' अ 'गट               '  ब 'गट
१)मीठ -            समुद्र
२)ऊस     -        शेत
३)मकाणे  -       गोड्या पाण्याचे तळे
४)बोरे     -          वन
५)भाजीपाला -  मळा

प्रश्न ३ .पुढील तक्ता पूर्ण करा .
१)बाजरीची   - कणसे

२)ज्वारीची -   कणसे

३)गव्हाच्या  -  लोंब्या

४)भाताच्या  - लोंब्या

५ )भुईमुगाच्या -  शेंगा

प्रश्न ४ .माहिती मिळवा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१)समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
उत्तर - समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागर म्हणतात .

२)शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात मुळा ही जमिनीखाली तयार होतो वनस्पतीपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात ?
उत्तर - वनस्पतींपासून रताळे ,बीट इत्यादी कंदमुळे मिळतात .

३)शेतकरी तिफण नावाचे अवजार कशासाठी वापरतात ?
उत्तर -शेतकरी तिफण नावाचे अवजार नांगरणीसाठी वापरतात .

४)कणगी म्हणजे काय ? त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो ?
उत्तर -धान्य साठवण्याची जागा म्हणजे कणगी .कणगी मध्ये धान्य साठवल्या मुळे उंदीर घुशी यांपासून धान्याची नासाडी होत नाही .

५)लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात ?ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात ?
उत्तर -लिंबाचा सरबत बनवण्यासाठी पाणी लिंबू मीठ साखर इत्यादी पदार्थ लागतात .त्यासाठी लागणारे लिंबू शेतातून , मीठ समुद्राच्या पाण्यापासून ,साखर ऊसापासून कारखान्यात तयार केली जाते .

प्रश्न ५ .काय करावे बरे .
१)डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कोठून येतात ?
उत्तर -डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत जंगलातून येतात .

२)घरात धान्य आल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते ?
उत्तर - घरात धान्य आल्यानंतर धान्य निवडणे , धान्य दळून पीठ करणे ,पीठ मळणे ,पीठ थापने व भाजने ही कामे करावी लागतात .

प्रश्न ६ .पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .
 १)शेतकरी शेतीची मशागत कशी करतात ?
उत्तर -शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडतात . शेत नांगरुन जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार  करतात .

२)धान्य सार्‍या देशभर कसे पोहोचवले जाते ?
उत्तर -धान्य देशभर वाहतुकीच्या साधनांचा वापर करून पोहोचवले जाते धान्य पोहोचवण्यासाठी मालगाड्या , ट्रक, टेंपो इत्यादी साधनांचा वापर केला जातो .

३)अन्न वाया घालवायचे नाही ?
उत्तर - पिकवण्या पासून अन्नपदार्थ बनवण्या पर्यंत अनेक लोक कष्ट करतात .शेतकरी , मजूर वाहक ,व्यापारी , दुकानदार ,घरातील स्त्रिया इत्यादी व्यक्ती मशागतीपासून खाद्यपदार्थ पर्यंत अनेक कष्टाची कामे करतात म्हणून अन्न वाया घालू नये .

वेब सोर्स- ई बालभारती 

Post a Comment

Previous Post Next Post