मी
चिमणी बोलतेय . कसे आहात तुम्ही , मला ओळखले का ? मी रोज तुम्हाला चिवचिवाट करून
उठविते. तुमच्या घराच्या खिडकीतून आत येते , आठवते ना तुम्हाला ! तुमच्या घरातील आरस्यावर चोच मी
चोच मारायचे ,तुम्ही आनंदाने हसायचा , तुम्ही जवळ आला कि , आम्ही पटकन उडून जायचो.
आता त्या खिडक्या कायम बंद
असतात . पूर्वी तुमचे घर मातीने बनविलेले असायचे तेव्हा आम्ही तेथे छोटेसे घरटे
तयार करायचो पण आता सर्व घरे सिमेंटची झाली आहेत . आम्हाला घर बांधायला कुठेच जागा
सापडत नाही .त्यामुळे आमची संख्या कमी झाली आहे . सद्यातर आम्हाला अन्न मिळणेही
कठीण झाले आहे .पूर्वी बाहेर दळण करताना आम्हाला धान्य मिळायचे . काही लोक
आमच्यासाठी आवर्जून धान्य टाकायचे . काही बाहेर अन्नाचे कण मिळायचे. अशाप्रकारे
आमचे पोट भरायचे .
घरामध्ये आता पंखे चालू असतात ,
कोणीच बाहेर दाणे टाकत नाही,
आम्हाला मिळणारे अन्न बंद झाले आहे . बाहेरच्या झाडावरील किडे खाण्यास गेल्यावर
रसायने फवारणी असल्याने आमचे कितीतरी
सोबती मरण पावले आहेत . त्यातच मोबाईलचे खूप टॉवर उभे झाले आहेत . त्यांचा वाईट
परिणाम आमच्यावर होतो .यामुळे आमची संख्या कमी झाली आहे .