साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
फुलपाखरू

प्रश्न१.एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) फुलपाखरू कोठे दंग झाले आहे?
 उत्तर- फुलपाखरू फुलांच्या दुनियेत दंग झाले आहे.

२)फुलपाखरू हळूच काय टिपते?
 उत्तर - फुलपाखरू हळूच फुलांचे रंग टिपते.

३) फुलपाखरू कशावर बसून हसते?
उत्तर- फुलपाखरू फुलांवर खुदकन हसते.

४) फुलपाखरू फुलांचे रंग कोठे फासते ?
उत्तर - फुलपाखरू फुलांचे रंग पंखांना फासते.

५) फुलपाखराच्या अंगावर कोणत्या रंगाचे ठिपके असतात?
उत्तर-  फुलपाखराच्या अंगावर निळसर जांभळ्या रंगाचे ठिपके असतात.

प्रश्न२. कसे ते लिहा.

१) फुलपाखरू रंग टिपते-- हळूच

 २) फुलपाखरू हसते---खुदकन

प्रश्न ३. कुठे ते लिहा.

१) फुलपाखरू दंग होते -- फुलांच्या दुनियेत

 २) फुलपाखरू बसते --  फुलांवर


 प्रश्न४. प्रत्येक रंगाच्या वस्तू लिहा.
निळा - आकाश
पिवळा - गुलाबाचे फूल
पांढरा - ससा
हिरवा - गवत 
लाल - सफरचंद
काळा  - केस

1 Comments

Previous Post Next Post