अन्नातील विविधता
प्रश्न १ .थोडक्यात उत्तरे लिहा .
१)गव्हापासून कोणकोणते अन्न पदार्थ बनवले जातात ?
उत्तर - गव्हाच्या पिठापासून चपाती , पोळी , पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात .तसेच गव्हाच्या चिकापासून पापड्या कुरडया इत्यादी वाळवून तळायचे पदार्थ बनवतात .गव्हापासून लापशी ,शिरा , खीर इत्यादी गोड पदार्थ बनवतात .
२)विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा .
उत्तर - भुईमुगाचे तेल , करडईचे तेल , खोबरे तेल ,तिळाचे तेल इत्यादी खाद्यतेलांची नावे आहेत .
३)तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता ?हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो ?
उत्तर - आमच्या गावी केला जाणारा विशेष पदार्थ म्हणजे पुरणपोळी .पुरणपोळी गूळ डाळ गव्हाचे पीठ यापासून बनवतात .
प्रश्न २ .गटात न बसणारे अन्नपदार्थभोवती गोल करा गटात तो न बसण्याचे कारण लिहा .
१)कैरी लोणचे ,आंबा ,मुरांबा ,आमरस
उत्तर - आंबा
कारण - बाकी पदार्थ त आंब्यापासुन बनवलेले आहेत .
२)पुलाव ,पराठा , दहीभात , बिर्याणी .
उत्तर - पराठा
कारण -पराठा हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवला जातो .बाकी सर्व पदार्थ तांदळापासून बनवलेले आहेत .
३)मैसूरपाक ,पुरणपोळी ,थालीपीठ , झुणका भाकर .
उत्तर -मैसूरपाक
कारण -मैसूर पाक हा पदार्थ कर्नाटक मध्ये बनवला जातो . बाकी पदार्थ महाराष्ट्रातील आहे .
प्रश्न ३ .खालीलपैकी धान्य ,भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा यांपासून कोण कोणते अन्नपदार्थ होऊ शकतात त्यांची यादी करा .
उत्तर
प्रकार होणारे पदार्थ
१) कणीस - धान्य चपाती , पोळी ,पराठा
२)गवार - भाजी भाजी ,कोशिंबीर
३)भोपळा -फळभाजी पुरी , भाजी ,भरीत इ .