साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
 ४.शिवरायांचे बालपण

प्रश्न १ . रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१.शिवरायांचा जन्म        शिवनेरी         किल्ल्यावर झाला .

२.आदिलशाहाने शहाजीराजांची         कर्नाटकातील           प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली .

३.शिवनेरी किल्लाचा  किल्लेदार          विजयराज     याने जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली .

४.शहाजीराजांनी कर्नाटकातील        बंगळूर      हे आपले मुख्य ठाणे केले .

५ . शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे       आदिलशाहाने       बेचिराख करून टाकले .  

प्रश्न २ . प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

१.जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागली ?
उत्तर - जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात असे विचार घोळू लागले की , मोठे झाल्यावर आपणही शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत .

२ . शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत ?
उत्तर - शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव,चेंडू , भोवरा इत्यादी खेळ खेळत असत .


३.शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला?
उत्तर - निजामशाहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली , या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला .

४.शिवाजीराजांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर -शिवाजीराजांचा जन्म फाल्गुन वद्यतृतीया , शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला .

५.शिवाजीराजांचे नाव ' शिवाजी ' असे का ठेवले?
उत्तर - शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला;म्हणून शिवरायांचे नाव ' शिवाजी ' असे ठेवले .

प्रश्न ३ . प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .

१.जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत ?
उत्तर - जिजाबाई शिवरायांना राम, कृष्ण , भीम,अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगत .साधुसंतांच्या चरित्रांतीलही गोष्टी सांगतअसत . शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत .

२.शहाजीराजांनी निजामशाहाच्या वंशातील मुलाला' निजामशाहा 'म्हणून जाहीर का केले ?
उत्तर - वजीर फत्तेखानने निजामशाहाचीच हत्या केल्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून मुघल बादशाहाने फत्तेखानास शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूख परस्पर देऊन टाकला.मुघल बादशाहास व वजीर फत्तेखानास शह देण्यासाठीशहाजीराजांनीनिजामशाहाच्या वंशातील एका मुलाला'निजामशाहा'म्हणून जाहीर केले .

Post a Comment

Previous Post Next Post