उन्हाळी अभ्यास

उन्हाळी अभ्यास उपलब्ध आहे
मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे

प्रश्न१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१.शहाजीराजे            संस्कृतचे         गाढे पंडित होते.

२.मावळात राहणाऱ्या लोकांना          मावळे             म्हणतात .

३.दादाजी कोंडदेव हे        कोंढाण्याचे            सुभेदारही होते .

४.शहाजीराजांच्या आदेशाने दादाजी कोंडदेव यांनी जिजाऊ व शिवराय यांना पुण्यात 
राहण्यासाठी              लाल महाल              नावाचा मोठा वाडा बांधला .

५.शहाजीराजांच्या शत्रूंनी         पुणे         जहागीर उजाड करून टाकली होती.

प्रश्न२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

१.शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणुक कोणी व कोठे केली ?
उत्तर - शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर येथे  शिक्षकांची नेमणूक केली .

२.शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विदया शिकवण्यास प्रारंभ केला ?
उत्तर -- शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे,कुस्ती खेळणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे इत्यादी विदया शिकवण्यास प्रारंभ केला .

३.दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट का दिली ?
उत्तर - शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी, म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना
 साऱ्याची सूट दिली .

४.शहाजीराजांनी बंगळूरहून शिवरायांबरोबर निरनिराळे अधिकारी का पाठवले होते ?
उत्तर - शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रितीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी बंगळूरहून शिवरायांबरोबर निरनिराळे अधिकारी पाठवले होते .


प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१.पुण्याचे रुप कसे पालटले ?

उत्तर - जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर लोकांना मोठा धीर आला .जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोकपुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले.जिजाबाईनी पडकी मंदीरे दुरुस्त करून घेतली, त्यामुळे सकाळ- संध्याकाळ देवपूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रुप पालटले.

२.शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या ?
उत्तर -उत्तम कारभार कसा करावा. शत्रुशी गनिमी काव्याने युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे . घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी;तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विदया शिवरायांना अवगत झाल्या .

३.जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता ?
उत्तर - शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही . तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करील, असा जिजाबाईंनी निश्चय केला होता .
मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे
मराठा सरदार शिवरायांचे कर्तबगार घराणे
https://youtu.be/mdIUaxZO4sE

Post a Comment

Previous Post Next Post