डॉ . बाबासाहेब आंबेडकर
(१४ एप्रिल १८९१ — ६ डिसेंबर १९५६)
अध्यक्ष महोदय व उपस्थित माननीय प्रमुख अतिथी आणि माझ्या मित्रांनो,
आज मी तुम्हाला एका महामानवाबद्दल माहिती सांगणार आहे ते आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.
बाबासाहेबांचे मुळगाव रत्नागिरी जिल्हात मंडणगडाजवळ आंबडवे आहे
वडिलांचे नाव रामजी सकपाळ असे होते ,ते लष्करात सुभेदार मेजर होते.
आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला.त्यांच्या आई भीमाबाईंचा मृत्यु झाला तेव्हा बाबासाहेब सहा वर्षांचे होते .
पुढे आंबेडकरांचा सांभाळ रामजी व त्यांची बहीण मीराबाई ह्यांनी केला,
बाबासाहेबांना शिक्षणाची खूप आवड होती . आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण
साताऱ्यामध्ये घेतले. पुढील शिक्षणानंतर त्यांचा विवाह रमाबाई झाला. १९१३ साली बडोदा नरेश
सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत
गेले .तेथे त्यांनी खूप अभ्यास केला व पदव्या मिळवल्या .
भारतात आल्यानंतर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली.
बाबासाहेबांनी १९२० साली मूकनायक नावाचे पाक्षिक काढले. पुढे त्यांनी इंग्लंडला
जाऊन डी. एससी . नावाची पदवी मिळवली . ते बॅरिस्टर झाले . १९२४ मध्ये त्यांनी
‘बहिष्कृत हितकारिणी’ नावाची संस्था स्थापन केली. १९२७ मध्ये बाबासाहेबांनी
स्वतः महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन तेथील जुनी परंपरा संपवली
व १९३० साली नाशिक येथे काळराममंदिर-प्रवेशासाठी सत्याग्रह केला .
भारतीय संविधान तयार करण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे .
त्यांनी लिहिलेले प्राचीन भारतातील व्यापार (एन्शंट इंडियन कॉमर्स) , भारताच्या
राष्ट्रीय नफ्याचा वाटा: एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक अध्ययन आणि द
प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे प्रबंध प्रसिद्ध आहेत .
त्याचबरोबर त्यांनी विचार करायला लावणारे पुढील प्रसिद्ध लेखन केले :
1) व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अन्टचेबल्स (१९४५)
2) ॲनाय्हिलेशन ऑफ कास्ट्स (१९३७)
3) हू वेअर द शूद्राज ?(१९४६)
4) बुध्द अँड हिज धम्म हा (मरणोत्तर प्रसिध्द ) (१९५७)
5) द अन्टचेबल्स (१९४८)
6) थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४०)
7) रानडे, गांधी अँड जिना (१९४३)
8) थॉट्स ऑन लिग्विस्टिक स्टेट्स (१९५५)
१४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथे अनेक अनुयायांसोबत बौध्द धर्माचा .
स्वीकार केला .बाबासाहेबांना वाचनाची खूप आवड होती. ६ डिसेंबर १९५६
साली बाबासाहेबांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला ,
या महामानवास कोटीकोटी नमन ........